Talathi Exam 2023 : तलाठी परीक्षा नियोजित वेळतच होणार; उमेदवारांनी वेळेपूर्वी हजर राहावं, आयोजन संस्थेचा मेल

Talathi Exam 2023 : जालन्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी बेच्छुट लाठीमार केला. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून अनेक ठिकाणी मराठा संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. 

आज म्हणजेच ४ ऑगस्ट रोजी विविध संघटनांनी राज्यभरात बंद पुकारला आहे. त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज तलाठी भरतीचा पेपर आहे. या पेपरबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

राज्यात विविध संघटनांनी बंद पुकारला असला तरीही तलाठी भरतीची परीक्षा नियोजित वेळतच होणार, असं स्पष्टीकरण परीक्षेचं आयोजन करणाऱ्या संस्थेनं दिलं आहे. विद्यार्थ्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन वेळेपूर्वीच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावं, असं आवाहनही करण्यात आलं आहे. यासंदर्भातील एक मेल सर्व उमेदवारांना पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर त्याचा निषेध करण्यासाठी राज्यातील विविध संघटनांनी आज म्हणजेच सोमवारी बंद पुकारला आहे. त्यामुळे वाहतूकीमध्ये अडचणी येण्याची शक्यता असून तलाठी परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे

Pandharpur News : शासन आपल्या दारी कार्यक्रम आता गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरच; पंढरपुरात मराठा समाजाचा इशारा

त्यामुळे महसूल परीक्षा केंद्रावर पोहचण्याची मुलांची संधी हुकली, तर त्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, मागणी राज्यातील अनेक नेत्यांनी केली आहे. दुसरीकडे विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ आज संभाजीनगरमध्ये बंद पुकारला जाणार आहे. त्यामुळे तलाठी परीक्षेसाठी निघालेले विद्यार्थी चिंतेत आहे. मात्र, एकाही विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. उद्याचा बंद शांततेत असणार असून तुम्हालाच काय कुठल्याही नागरिकाला त्रास देणारा असणार नाही, याची ग्वाही आम्ही देतो असं मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील यांनी सांगितलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply