T20 World Cup 2024 Super 8 : ऑस्ट्रेलियाच्या विजयाने बदललं समीकरण, 20 पैकी 2 संघ वर्ल्ड कपमधून बाहेर, तर 2 जणांची जागी पक्की

T20 World Cup 2024 Australia Super 8 : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने नामिबियाला हरवून सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. नामिबिया 72 धावांवर ऑल आऊट झाल्याने ऑस्ट्रेलियाने अवघ्या 5.4 षटकात सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्या सहज गाठले. आता ऑस्ट्रेलिया सुपर-8 साठी पात्र ठरणारा दुसरा संघ बनला आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर आता नामिबियाही सुपर-8 च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

वर्ल्ड कपमधून 20 पैकी 2 संघ बाहेर

यावेळी टी-20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघ खेळत आहेत. स्पर्धेतील 24 सामने खेळले गेले आहेत. 24 सामन्यांनंतर 2 संघ सुपर-8 च्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. प्रथम ओमानचा संघ सुपर-8 च्या शर्यतीतून बाहेर पडला, यानंतर नामिबिया आता सुपर-8 मधून बाहेर पडणारा दुसरा संघ बनला आहे.
सुपर-8 साठी 2 संघ पात्र

IND Vs USA, Live Streaming : टीम इंडियासमोर अमेरिकेचं आव्हान! कुठे अन् किती वाजता रंगणार सामना?

टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सुपर-8 साठी पात्र ठरणारा दक्षिण आफ्रिका पहिला संघ ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला हरवून पात्रता मिळवली होती. आफ्रिकेने आतापर्यंत या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. तिन्ही सामने जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे सध्या 6 गुण झाले आहेत. आता ऑस्ट्रेलिया हा नामिबियाला हरवून सुपर-8 साठी पात्र ठरणारा दुसरा संघ बनला आहे. ऑस्ट्रेलियानेही आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत.
एकतर्फी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नामिबियाचा 9 गडी राखून पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नामिबियाला 17 षटकांत अवघ्या 72 धावांत गुंडाळले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने अवघ्या 5.4 षटकांत हे लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी हा सामना एकतर्फी केला होता. कांगारू संघाकडून अॅडम झाम्पाने सर्वाधिक 4 बळी घेतले. याशिवाय हेझलवूड आणि स्टॉइनिसने २-२ विकेट घेतल्या.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply