T20 World Cup 2024 : विश्वचषकातील भारत- पाकिस्तान सामना संकटात? ISIS च्या धमकीमुळे अमेरिकेत खळबळ

T20 World Cup 2024 : 120 विश्वचषकात 9 जून रोजी न्यूयॉर्क, अमेरिकेत खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर दहशतवादाचे सावट पसरले आहे. ISIS ने IND vs PAK सामन्यादरम्यान दहशतवादी हल्ले करण्याची धमकी दिली आहे.ISIS ने एक पोस्टर जारी करून अतिशय भीतीदायक संदेश पाठवला आहे. या धमकीनंतर गुप्तचर विभाग अलर्ट मोडवर आले असून त्यांनी न्यूयॉर्कमधील सुरक्षा व्यवस्था आधीच वाढवली आहे.

कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा महान सामना रविवार, जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.उल्लेखनीय आहे की IS ने ब्रिटिश चॅट साइटवर नासाऊ काउंटीमधील आयझेनहॉवर पार्कमधील क्रिकेट स्टेडियमचे चित्र पोस्ट केले होते, ज्यावर ड्रोन उडत होते, ज्यामध्ये 9/06/2024 ही तारीख दर्शविली होती, ज्या दिवशी भारत पाकिस्तान सामना आहे.

T20 World Cup 2024 : फिल्डिंगसाठी उतरले कोचआणि सिलेक्टर, वर्ल्डकप सामन्यात टीम ऑस्ट्रेलियावर का आली अशी वेळ?

अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने 2 जूनपासून 120 विश्वचषक 2024 सुरू होणार आहे. भारत 5 जून रोजी आयर्लंडविरुद्धच्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. यानंतर १ जूनला पाकिस्तानशी सामना होणार आहे.भारत आणि पाकिस्तानसह जगभरातील क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, दहशतवादी हल्ल्याच्या धमकीने सर्वांनाच हादरवले आहे.


न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हाँचुल यांनी सांगितले की, त्यांनी राज्य पोलिसांना सुरक्षा उपाय वाढवण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यात कर्मचाऱ्याऱ्यांची उपस्थिती, पाळत ठेवणे आणि तपासणी प्रक्रिया कडक करणे समाविष्ट आहे. न्यूयॉर्क शहराच्या सीमेला लागून असलेल्या नासाऊ काउंटीमध्ये हा सामना होणार आहे.काउंटी चीफ बुस ब्लेकमन म्हणाले की, आम्ही प्रत्येक संभाव्य परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे. यासाठी आम्ही अनेक खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. ते म्हणाले की, आम्ही प्रत्येक धमकी गाभीयनि घेतो. प्रत्येक धोक्यासाठी समान प्रक्रिया आहे. आम्ही कोणतेही धोके कमी लेखत नाही.


T20 विश्वचषक 2024 2 जूनपासून सुरू होत आहे. ही स्पर्धेची आतापर्यंतची नववी आणि सर्वात मोठी स्पर्धा असेल. वावर्षी प्रथमच 20 संघ विश्वचषकासाठी स्पर्धा करणार आहेत.इंग्लंडचा संघ गतविजेता असून त्याचे नेतृत्व जोस बटलर करणार आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली इंग्लिश संघ 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 विश्वचषकात चॅम्पियन बनला होता.त्याचबरोबर भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका है संघही विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply