Swargate Bus Depot Case : शिवशाही अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट; दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी पूर्ण, तपासाला वेग येणार

Swargate Bus Depot Case :  स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आरोपी दत्ता गाडे याची डीएनए चाचणी पूर्ण झाली आहे. शिवशाही बसमध्ये आढळून आलेल्या केसांचे नमुने आणि दत्ता गाडे याच्या केसांच्या नमुण्याची पडताळणी झालीय. पोलिसांना दत्ता गाडे याच्या डीएनए चाचणीचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे, त्यानंतर पोलिसांच्या तपासाला आणखी वेग येणार आहे.

२५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी साडेपाच वाजता पुण्यातील स्वारगेट एसटी डेपो मध्ये शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरूणीसोबत दोन वेळा बलात्कर झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. ज्या शिवशाही बसमध्ये बलात्काराचे कृत्य घडले त्या बसची फॉरेन्सिक विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे. या तपासणी दरम्यान शिवशाही बसमध्ये काही केस आढळून आले आहेत. या केसांच्या सोबत आरोपी दत्ता गाडे याच्या केसांच्या सॅम्पलिंग डीएनए चाचणीद्वारे मॅचिंग करण्यात येणार आहे.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply