Supriya Sule : सुप्रिया सुळेंना बारामतीत धक्का! प्रवीण माने सुनेत्रा पवारांना देणार पाठिंबा? आज स्पष्ट करणार भूमिका

Supriya Sule : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर घडामोडींना वेग आला आहे. नेत्यांच्या गाठीभेटी, पक्षांतर, जागा वाटप, बैठका सुरू आहेत. अशातच सुप्रिया सुळे यांना भाजपने मोठा धक्का दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांची भेट घेतली. प्रविण माने हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या इंदापूर तालुका प्रचार समितीचे प्रमुख आहेत. भेटीनंतर ते महायुतीसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

निवडणुका तोंडावर असतानाच सुप्रिया सुळेंना मोठा धक्का बसल्याच्या चर्चा सुरू आहेत. शरद पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने अजित पवार गटात जाणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर सोनाई ग्रुपचे संचालक दशरथ माने देखील अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे. तर प्रवीण माने हे इंदापुरात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Pune Lok Sabha 2024 : पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख असलेले जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने वेगळी भूमिका मांडणार का हे पाहणंही महत्त्वाचं आहे. अजित पवार यांच्या कडून शरद पवारांना हा मोठा धक्का असणार आहे. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माने यांच्या निवासास्थानी जाऊन भेट घेतली होती

प्रवीण माने आणि दशरथ माने हे सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इंदापुर दौऱ्यावर आले होते, यावेळी त्यांनी प्रवीण माने, दशरथ माने यांची भेट घेतली होती. त्यानंतर हे दोघे अजित पवारांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. तर काही दिवसांपुर्वी हे दोघे सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत होते. अशातच फडणवीसांच्या भेटीनंतर प्रवीण माने, दशरथ माने यांच्या भूमिकेत बदल होऊन ते सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे, त्यामुळे सुप्रिया सुळेंना हा मोठा धक्का असणार आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply