
Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्रिपद कुणाकडे जाणार, या चर्चेला शुक्रवारी पूर्णविराम मिळाला. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची आज, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड होणार असून, त्या सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा यांनी ही जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदी कोणाची निवड होणार, याबाबत चर्चेला वेग आला. मात्र, सुनेत्रा पवार यांनीच पक्षाची धुरा सांभाळावी आणि उपमुख्यमंत्रिपदाचीही जबाबदारी घ्यावी, अशी सर्वांची इच्छा असल्याचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पटेल आणि तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची बैठक झाली. त्यानंतर विधिमंडळ पक्षाचे गटनेतेपद स्वीकारण्यास सुनेत्रा पवार यांनी होकार कळवला.
|
|
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक शनिवारी दुपारी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. मुंबईबाहेरील आमदारांना पक्ष कार्यालयाकडून निरोप पाठविण्यात आला असून, तटकरे यांनीही फोन करून बैठकीविषयी कळवले आहे. पक्षाच्या आमदारांच्या उपस्थितीत गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात येणार आहे. ‘सुनेत्रा पवार यांनी पक्ष सांभाळावा, ही सर्वांचीच इच्छा असून त्यात कुणालाही आक्षेप असण्याचे कारण नाही. उपमुख्यमंत्रिपदीही त्यांनाच संधी मिळावी, अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे,’ असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी त्यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होणार आहे. दरम्यान, विधिमंडळ गटनेते आणि उपमुख्यमंत्रिपदाविषयी निर्णय झाला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. पक्षाचे अध्यक्षपदही सुनेत्रा पवार यांच्याकडेच देण्याची इच्छा पक्षातील नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
'सीआयडी'कडून तपास
अजित पवार यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या विमान अपघाताची चौकशी आता राज्याचा गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) होणार आहे. एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरोकडून (एएआयबी) या अपघाताचा तपास सुरू असून, त्यांच्या निष्कर्षाबाबत सीआयडी तपास करणार आहे.
'राष्ट्रवादीच्या निर्णयाला आमचा पाठिबा'
नागपूर : उपमुख्यमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाला भाजप आणि सरकारचा पाठिंबा असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. 'राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दोन वेळा माझी भेट घेऊन चर्चा केली. पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस घेईल तो निर्णय मान्य असेल', असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलताना सांगितले.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel


1 thought on “Sunetra Pawar : राष्ट्रवादीचा मोठा निर्णय! सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री; गटनेतेपदी निवडीनंतर आज सायंकाळी शपथविधी”