Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत मोठी वाढ, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Sudhakar Badgujar : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकचे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीकडूनही तक्रार देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

वर्ष 2016 मध्ये बडगुजर यांनी पदाचा गैरवापर करून कंपनीला महापालिकेचा ठेका घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून चौकशी सुरू होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकीकडे सलीम कुत्ता प्रकरणी चौकशी सुरू असतांना दुसरीकडे एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chhagan Bhujbal : मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळालं तर आपला सरपंचही होणार नाही, ओबीसी सभेत भुजबळ पुन्हा गरजले

याच प्रकरणी तुम्हाला काही नोटीस देण्यात आली आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी सुधाकर बडगुजर यांना विचारला असता, ते म्हणाले आहेत की, मला अद्याप कोणतीही नोटीस मिळालेली नाही. अद्यापही प्रकरण काय हे मला माहित नाही, मी याची अधिक माहिती घेत असल्याचंही ते म्हणाले आहेत. 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच भाजप नेते नितेश राणे यांनी बडगुजर यांच्यावर आरोप केला होता की, त्यांचे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीम याचा उजवा हात समजला जाणाऱ्या सलीम कुत्ताशी संबंध आहेत. या दोघांचे पार्टी करतानाचे व्हिडीओही माझ्याकडे आहे. नितेश राणे यांच्या आरोपानंतर बडगुजर हे राज्यभरात चांगलेच चर्चेत आले होते.

राणे यांच्या आरोपांना उत्तर देताना सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि म्हणाले की, 'सलीम कुत्ताशी माझा संबंध नाही'. ते म्हणाले होते की, ''२०१६ मध्ये विजया रहाटकर प्रकरणात वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यासाठी सभा झाली होती. त्या सभेविरोधत शिवसैनिकांनी आंदोलन केलं, अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले. माझ्यावर देखील गुन्हा दाखल होता, मी १५ दिवस तुरुंगात होतो.''

ते पुढे म्हणाले होते की, ''तुरुंगामध्ये बॉम्ब स्फोटातील आरोपी होते. त्यांची आम्हाला कल्पना देखील नव्हती. माझ्यावर ज्या काही केसेस दाखल आहेत, त्या राजकीय आंदोलनातून आहेत. माझं नाव सलीम कुत्ताशी जोडलं गेलं, त्याला ९३ अटक झाली असेल. मला २०१६ मध्ये अटक झाली.''

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply