Subodh Savji : मुख्य निवडणूक आयुक्तांना जिवे मारण्याची धमकी, सुबाेध सावजींवर गुन्हा दाखल

Subodh Savji :  ईव्हीएम मध्ये घोटाळा केला तर मुख्य निवडणूक अधिकारी यांचा मर्डर करेल असा इशारा पत्राद्वारे देणा-या माजी मंत्री सुबोध सावजी यांच्यावर बुलढाणा पाेलिस दलाने अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती डोणगाव पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी अमरनाथ नागरे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

राज्यासह देशात लोकसभेच्या निवडणुका संपन्न होत आहेत. येत्या 4 जूनला निवडणुकीचा निकाल जाहीर हाेणार आहे. महाराष्ट्रा राज्यात 48 लोकसभेच्या जागांपैकी 35 ते 40 जागा या महाविकास आघाडीला मिळणार असल्याचा दावा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी नुकताच केला आहे.

Vasai Crime News : 49 किलो गांजासह चाैघांना अटक, पेल्हार पोलिसांची कारवाई

हा दावा करीत असताना सावजी यांनी देशातील सध्याचे सरकार हे ईव्हीएम मशीन घोटाळा करून महायुती सरकार आणण्याच्या तयारीत असल्याची शंका मतदारांमध्ये असल्याचे म्हटले. त्यांनी याबाबत निवडणूक आयुक्ताना पत्र पाठविले आहे. त्यात जर ईव्हीएम मशीन घोटाळा झाला तर मी तुमचा मर्डर करेल असे नमूद केले आहे.

दरम्यान सावजी यांच्या पत्राची आणि त्यांच्या माध्यमातील वक्तव्याची पाेलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव पोलिस ठाणे येथे सावजी यांच्यावर (कलम 506 अन्वये) अदखलपात्र गुन्हा नाेंदविल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस अधिकारी अमरनाथ नागरे यांनी दिली.

 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply