Student Aadhar Card Update : २ लाख ७४ हजार ४३१ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक चुकीचे

Student Aadhar Card Update : छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये २ लाख ७४ हजार ४३१ शालेय विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक चुकीचे आहेत. तर ५० हजार विद्यार्थ्यांच्या आधारची प्रक्रिया अद्याप होणे बाकी असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. हे आधार अपडेट नसलेल्या विद्यार्थ्यांना लाभ मिल्ने शक्य नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. 

शाळेत प्रवेशापासून ते पोषण आहार, शिष्यवृत्ती आणि इतर सुविधांसाठी शासकीय अनुदानित शाळांमध्ये आधार कार्ड  असलेल्या विद्यार्थ्यांनाच आता लाभ दिला जाणार आहे; असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे शाळांमध्ये पालकांनी अपडेट करून त्याची माहिती द्यावी; असे पालकांना सुचित  करण्यात आले होते. मात्र वारंवार सूचना देऊनही आधार जमा नसल्याच्या तक्रारी कायम आहेत. आता पालकांना नवीन आधार किंवा आधार अपडेट करण्याचे काम करावे लागणार आहे. 

Railway Crime : तामिळनाडूहुन कल्याणला आलेली चोरट्यांची टोळी गजाआड; १२ गुन्हे उघडकीस

अन्यथा निधी कमी 

आता नव्या सत्रातील गणवेशासह शालेय पोषण आहार  निधी कमी मिळेल असं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षकांची आधार वैधता तात्काळ पूर्ण करा; त्यानुसारच शाळांना पुढील वर्षाचे बजेट दिले जाणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply