St Service Closed : नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशीही एसटी सेवा बंद; ८० लाखाचे नुकसान

St Service Closed : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे अनेक आगारातून परिवहन महामंडळाची बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यानुसार  नांदेड जिल्ह्यात बंद असलेली बससेवा आज दुसऱ्या दिवशीही एसटी बंद आहे. यामुळे महामंडळाच्या नांदेड आगाराला ८० लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

मराठा आरक्षणासाठी  जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणानंतर राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यानुसार गेल्या दोन- तीन दिवसापासुन नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी ठीक ठिकाणी आंदोलन होत असुन रस्ते अडवले जात आहेत. त्यामूळे राज्य परिवहन महामंडळाने नुकसान टाळण्यासाठी एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर शुक्रवारपासून सकाळपासून संपूर्ण जिल्ह्यात एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. 

Pandharpur News : पंढरपुरात दोन लाख भाविक दाखल; माघी यात्रेसाठी आलेल्या भाविकांना जेवणाचीही सुविधा

नांदेड जिल्ह्यातील बस सेवा आज सलग दुसऱ्या दिवशी देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस प्रशासना आदेशानुसार एसटी सेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान गेल्या दोन दिवसात नांदेड जिल्ह्यात एसटी महामंडळाचे ८० लाखाचे नुकसान झाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply