ST News: महिलांसाठी गुडन्यूज! आजपासून बस प्रवासात 50 टक्के सवलत; शासनाकडून आदेश जारी

MSRTC News: राज्याचा अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी सादर झाला होता. यावेळी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या होत्या. ज्यामध्ये महिलांसाठी अनेक योजना राबवणार असल्याचे सांगितले होते. यामध्ये एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले होते.

मात्र त्याचा अध्यादेश अद्याप निघाला नव्हता. या बद्दलची एक महत्वाची बातमी आता समोर येत असून अखेर या आदेशाचा जीआर निघाला आहे. शुक्रवारपासून (17 मार्च) एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येईल. तसेच या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील प्रवाशांसाठी याआधीच सवलत जाहीर करण्यात आली आहे. जवळपास 30 प्रकारच्या सवलती राज्य सरकारकडून देण्यात येतात. या सवलतीची शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून महामंडळाला करण्यात येते. राज्य परिवहन महामंडळांकडून 30 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply