ST Bus Accident : ७० पेक्षा जास्त प्रवासी, चढावावरच एसटी बसचे ब्रेक फेल; आरडाओरड अन् गोंधळ; मलकापूर- सोलापूर मार्गावर अपघात

बुलढाणा : मलकापूर– सोलापूर मार्गावरील हातनी गावानजीक एसटीचे ब्रेक फेल झाल्याने एसटी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात गेली. यात अपघातात ६ प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. 

चिखलीवरून बुलढाण्याकडे राज्‍य परिवहन महामंडळाची एसटी निघाली होती. एसटीमध्ये ७० पेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत होते. या दरम्‍यान हातनी जवळील एसटी उंच भागातील रस्ता चढत असताना अचानक एसटीचे ब्रेक फेल झाले. यामुळे एसटी रिव्‍हर्स मागे जायला लागली. एसटीमधील प्रवाश्यांनी आरडा ओरड केली. पण चालकाच्या सावधानतेने बस रस्त्याच्या कडेला असलेल्‍या खड्यात जाऊन थांबली.

सदरच्‍या मार्गावर वाहनांची चांगलीच वर्दळ असते. मात्र तेवढ्या वेळात कोणताही वाहन रस्त्यावर नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात ६ प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या अपघाताने पुन्हा एसटी भंगार रस्त्यावर धावत असून प्रवाश्‍यांच्या जीवाशी खेळत असल्याचे सिद्ध झाले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply