SRH Vs RR : मोठे धमाके करणाऱ्या हैदराबादला राजस्थानने १७५ धावांत रोखलं

SRH Vs RR : आयपीएलच्या २०२४ च्या सीझनमध्ये स्कोअर बोर्डवर मोठे मोठे धमाके करणाऱ्या सरनरायझर्स हैदराबादला १७५ धावांवर रोखण्यात राजस्थानला यश आलं आहे. राजस्थानला विजयासाठी १७६ धावांची गरज आहे.  हेनरिच क्लासेन वगळता एकाही फलंदाजाला अर्धशतकापर्यंत पोहता आलं नाही ट्रॅविश हेड आणि राहुल त्रिपाठी यांनी आक्रमक फलंदाजी केली मात्र त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

आयपीएल 2024 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादविरोधात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने आखलेल्या रणनितीत नरायझर्स हैदराबादचे फलंदाज सहज अडकले. ट्रेंट बोल्टने सुरुवातीलाच ३ विकेट घेतल्या, तर युझवेंद्र चहलने तीन झेल घेतले. आवेश खानने सलग दोन चेंडूवर दोन फलंदाजांना तंबूत धाडलं. संदीप शर्माने २ विकेट घेतल्या.

T20 World Cup : ICC ची मोठी घोषणा! T-20 WC साठी शाहिद आफ्रिदीसह या दिग्गजांवर सोपवली मोठी जबाबदारी

दरम्यान सनरायझर्स हैदराबादने जर मॅच जिंकली तर तब्बल ६ वर्षांनंतर अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळणार आहे. 2018 मध्ये हा संघ आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला पण उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. यानंतर हा संघ 2019 आणि 2020 मध्ये प्ले ऑफमध्ये पोहोचला. यानंतर सलग तीन वर्षे संघाला लीग स्टेजवर समाधान मानावं लागलं होतं.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply