WPL 2024: ऑरेंज अन् पर्पल कॅपवर RCB च्या खेळाडूंचाच डंका! जाणून घ्या सर्वाधिक धावा अन् विकेट घेणारे 5 खेळाडू

WPL 2024, Most Runs and Wickets: वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचे विजेतेपद रविवारी (17 मार्च) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने विजेतेपद जिंकले. बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला अंतिम सामन्यात 8 विकेट्सने पराभूत केले.

अंतिम सामन्यात बेंगळुरूसमोर दिल्लीने 114 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग बेंगळुरूने शेवटच्या षटकात पूर्ण केल्या.

या सामन्यासह डब्ल्युपीएल स्पर्धेचा दुसरा हंगाम संपला. त्यामुळे या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंवर शिक्कामोर्तब झाले असून दुसऱ्या हंगामात पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप विजेते खेळाडूही मिळाले आहे.

हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देण्यात आली.

Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! पिसाळलेल्या घोड्याचा वृद्ध दांपत्यासह ६ जणांवर हल्ला; परिसरात खळबळ

सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 फलंदाज

दुसऱ्या हंगामात ऑरेंज कॅप रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या एलिस पेरीने जिंकले. तिने 9 सामन्यांत 69.40 च्या सरासरीने 347 धावा केल्या. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मेग लेनिंग असून तिने 331 धावा केल्या.

डब्ल्युपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज

  • 347 धावा - एलिस पेरी (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) (9 सामने)

  • 331 धावा - मेग लेनिंग (दिल्ली कॅपिटल्स) (9 सामने)

  • 309 धावा - शफाली वर्मा (दिल्ली कॅपिटल्स) (9 सामने)

  • 300 धावा - स्मृती मानधना (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) (10 सामने)

  • 295 धावा - दिप्ती शर्मा (युपी वॉरियर्स) (8 सामने)

    सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज

    दुसऱ्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्याच श्रेयंका पाटीलने सर्वाधिक 13 विकेट्स घेत पर्पल कॅप जिंकली. या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिच्यापाठोपाठ दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरही बेंगळुरूच्या आशा शोभना आणि सोफी मोलिनेक्स यांचा क्रमांक लागतो. या दोघींनीही प्रत्येकी 12 विकेट्स घेतल्या आहेत.

    डब्ल्युपीएल 2024 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 गोलंदाज

    • 13 विकेट्स - श्रेयंका पाटील (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) (8 सामने)

    • 12 विकेट्स - आशा शोभना (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) (10 सामने)

    • 12 विकेट्स - सोफी मोलिनेक्स (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) (10 सामने)

    • 11 विकेट्स - मॅरिझन कॅप (दिल्ली कॅपिटल्स)(7 सामने)

    • 11 विकेट्स - सोफी एक्लेस्टोन (युपी वॉरियर्स) (8 सामने)

    • 11 विकेट्स - जेस जोनासन (दिल्ली कॅपिटल्स) (7 सामने)

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply