IPL 2024 : आयपीएलचा दुसरा टप्पाही भारतातच होणार; अरुण धुमल

Sports : आयपीएलच्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले असून त्यानुसार २२ मार्च ते ७ एप्रिल या दरम्यानच्या लढतींची घोषणा करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन अरुण धुमल यांनी आयपीएलचा दुसरा टप्पाही भारतातच होणार असल्याचे संकेत दिले. तसेच या टप्प्यातील लढती होम व अवे अशा स्वरूपात होतील, असेही त्यांच्याकडून याप्रसंगी स्पष्ट करण्यात आले.

रतामध्ये २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक होती. त्यावेळीही आयपीएलचा संपूर्ण मोसम भारतातच पार पडला होता. यंदाही तसेच होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्‍चित झाल्यानंतर आयपीएलच्या पुढील टप्प्याबाबत निर्णय घेण्यात येईल. वेळापत्रकही जाहीर करण्यात येईल, असे अरुण धुमल पुढे सांगतात.

आयपीएलचा दुसरा टप्पा भारतात आयोजित करण्याचा प्रयत्न आहे. तसेच प्रत्येक संघाला स्वत:च्या घरच्या स्टेडियमवर सामने खेळायला मिळायला हवेत यासाठीही पुढाकार घेण्यात येणार आहे. वेळेअभावी हे होऊ न शकल्यास यामधून योग्य तो पर्याय निवडून मार्ग शोधला जाणार आहे, असेही ते नमूद करतात.

Nandini Rajbhar: एसबीएसपीच्या प्रदेश महासचिव नंदिनी राजभर यांची हत्या; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

भारताबाहेर स्पर्धा अशक्यच

आयपीएलचा पुढील टप्पा भारताबाहेर होण्याची शक्यता अरुण धुमल यांनी नाकारली. ते म्हणाले, एप्रिल-मे या दरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे प्रचंड उन्हाळा असतो. त्यामुळे तेथे सामने होऊ शकत नाहीत. तसेच इतर देशांच्या द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय मालिका सुरू आहेत. शिवाय कमी अवधीत आयपीएलसारखी मोठी स्पर्धा आयोजित करणे सोपे काम नाही, असे स्पष्टीकरण अरुण धुमल यांनी या वेळी दिले.

 
मे महिन्याच्या शेवटी फायनल

बीसीसीआय व आयपीएल संयोजन समितीसमोर यंदा लोकसभा निवडणूक तसेच टी-२० विश्‍वकरंडकाचाही अडथळा आले. एक जूनपासून वेस्ट इंडीज व अमेरिका येथे टी-२० विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे.

त्याआधी आयपीएल आटोपणे गरजेचे आहे. याबाबत अरुण धुमल म्हणतात, आयपीएलचा अंतिम सामना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खेळवण्याचा प्रयत्न असणार आहे. २५ ते २६ मे या दिवशी अंतिम सामन्याचे आयोजन करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यासाठी साखळी फेरीत एका दिवशी दोन लढतींचा थरार खेळवण्याची योजनाही आहे.

 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply