IPL 2024, CSK vs GT: ऋतुराज अन्‌ गिल एकमेकांना भिडणार! कसा राहिलाय चेन्नई-गुजरातचा 'हेड टू हेड' रेकॉर्ड?

IPL 2024, CSK vs GT: इंडियन प्रीमियर लीग २०२४ हंगामात (IPL 2024) मंगळवारी (26 मार्च) गतविजेता चेन्नई सुपरकिंग्स आणि गतउपविजेता गुजरात टायटन्स आमने-सामने येणार आहेत. त्याचमुळे ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल या दोन युवा खेळाडूंच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

चेन्नईत लढत रंगणार असून दोन्ही कर्णधार विजयी वाटचाल कायम ठेवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसतील.

महेंद्रसिंग धोनीने नेतृत्वपदावरून माघार घेतल्यानंतर ऋतुराज गायकवाड याच्याकडे चेन्नई संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले, तर हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सने आपल्याकडे घेतल्यामुळे शुभमन गिल गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार झाला.

महेंद्रसिंग धोनीच्या मार्गदर्शनाखाली ऋतुराजने सलामीच्या लढतीत अव्वल दर्जाचे नेतृत्व केले. वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेला बंगळूरविरुद्धच्या सलामीच्या लढतीत सूर गवसला नाही.

Lok Sabha Election 2024 : नंदुरबारमधील ९ हजार मतदार घरबसल्या करणार मतदान

शार्दुल ठाकूर, मुकेश चौधरी संधीच्या प्रतीक्षेत आहेत. मथीशा पथिराना हा वेगवान गोलंदाज पूर्णपणे तंदुरुस्त असल्यामुळे या लढतीसाठी चेन्नई संघात त्याचीही निवड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान शुभमन गिलनेही मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात उत्तम नेतृत्व करत गुजरातला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष राहिल.

आमने-सामने

चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स आत्तापर्यंत 5 सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 2 सामने चेन्नई सुपर किंग्सने जिंकले आहेत, तर 3 सामने गुजरात टायटन्स संघाने जिंकले आहेत.

हे दोन संघ गेल्यावर्षी आयपीएलच्या अंतिम सामन्यातही आमने सामने आले होते. त्यावेळी चेन्नई सुपर किंग्सने रोमांचक विजय मिळवला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply