MS Dhoni: धोनीने CSK चे कर्णधारपद सोडण्यावर कोच फ्लेमिंग यांचे स्पष्टीकरण, ‘2022 मध्ये आम्ही तयार नव्हतो, पण आता...’

CSK Captain News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे. परंतु या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझीने सर्वांना धक्का देणारी घोषणा गुरुवारी केली.

एमएस धोनीने या संघाचे कर्णधारपद सोडत ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्वाची धुरा सोपवली. त्यामुळे आता आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करताना दिसेल.

दरम्यान, या निर्णयाबद्दल चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी 2022 मधील नेतृत्वबदलाच्या अनुभवाबद्दलही सांगितले.

Mallikarjun Kharge : निष्पक्ष निवडणूक व लोकशाही धोक्यात; खर्गे यांचे स्वायत्त संस्थांच्या बांधिलकीवर प्रश्नचिन्ह

खरंतर 2022 आयपीएलआधी देखील धोनीने नेतृत्वपद सोडत रविंद्र जडेजाकडे ही जबाबदारी सोपवली होती. परंतु, पहिल्या हाफमध्येच संघाला आलेल्या अपयशानंतर जडेजाने ही जबाबदारी सोडली. त्यामुळे पुन्हा एकदा धोनीने ही जबाबदारी स्विकारली.

2023 मध्ये त्याने त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईला पाचव्यांदा आयपीएल विजेतेपदही जिंकून दिले. यानंतर आता धोनीने आयपीएलच्या 17 व्या हंगामाआधी कर्णधारपद सोडत ही जबाबदारी युवा ऋतुराजकडे सोपवली आहे.

याबद्दल पत्रकार परिषदेत फ्लेमिंग म्हणाले, 'हा धोनीचा निर्णय होता. खूप विचार केल्यानंतर आणि गेल्यावर्षीचा हंगामात इतका चांगला गेल्यानंतर घेतलेला हा निर्णय आहे. ही वेळही योग्य आहे.'

'पडद्यामागे ऋतुराज आणि अन्य खेळांडूंवरही काम सुरू होते. पुढचा कर्णधार करण्याची प्रक्रिया सुरू होती. पण एमएस धोनीच हा निर्णय योग्य प्रकारे घेऊ शकणार होता आणि त्याला आत्ता वाटले की वेळ योग्य आहे.'

आयपीएल 2022 आणि सध्याच्या निर्णयांबद्दल बोलताना फ्लेमिंग म्हणाले, 'दोन वर्षांपूर्वी एमएस धोनी बाजूला होईल, हे आम्हाला अपेक्षित नव्हते, त्यासाठी आम्ही तयार नव्हतो.  त्यामुळे नेतृत्व गट किंवा आम्हा प्रशिक्षकांना पूर्ण हलवले होते की तो गेल्यानंतर आमच्याकडे काय पर्याय आहेत, याचा विचार करायला लावला.'

'तोपर्यंत हा विचारही आम्ही केला नव्हता, पण त्यामुळे बीज रोवले गेले. त्यामुळे आम्ही त्यावर काम केले आहे आणि पुन्हा अशी चूक होणार नाही, याची आम्ही काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

याशिवाय फ्लेमिंग यांनी ऋतुराजवर कर्णधार म्हणून विश्वास दाखवला आहे. त्यांनी सांगितले की त्याला सध्या मदत करायला जडेजा आणि धोनीही मैदानावर असतील आणि त्यालाही स्वत:ला आत्मविश्वास आहे. याबरोबरच फ्लेमिंग यांनी म्हटले की आता संघव्यवस्थापन धोनीनंतर काय, याचाही विचार करत आहे.

दरम्यान, ऋतुराजने यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply