Sandeep Warrier as replacement for Mohammed Shami : आयपीएल 2024 साठी जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कारण आयपीएलचा थरार उद्यापासून म्हणजेच 22 मार्चपासून रंगणार आहे. जिथे एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा सामना फॅफ डु प्लेसिस आणि स्टार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ चेन्नईत उपस्थित आहेत.
दरम्यान, गुजरात टायटन्सनेही आपल्या तयारीत कोणतीही कसर सोडली नाही. हंगाम सुरू होण्याआधीच दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या बदलीची घोषणा केली आहे. वर्ल्ड कपदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे शमी या संपूर्ण हंगामातून बाहेर आहे आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.
...म्हणून धोनी क्रिकेटपासून दूर जात गेला', IPL आधी टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचे मोठे वक्तव्य |
आयपीएल 2024 सुरू होण्याच्या दोन दिवस आधी म्हणजे बुधवार 20 मार्च रोजी गुजरात टायटन्सने त्यांच्या संघात बदल केले आणि संदीप वारियरचे नाव जाहीर केले. आयपीएल 2024 मध्ये शमीची जागा संदीप घेणार आहे.
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज शमीवर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि तो सध्या बरा झाला आहे. त्याच्या जागी खेळणाऱ्या संदीप वारियरने आतापर्यंत 5 आयपीएल सामने खेळले आहेत. गुजरात टायटन्सने त्याला ५० लाख रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले आहे.
संदीपच्या आयपीएल रेकॉर्डवर एक नजर टाकली तर, त्याने 5 सामन्यात केवळ दोन विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, वॉरियरला आयपीएलमध्ये फारशा संधी मिळालेल्या नाहीत. तो केकेआरकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. याशिवाय तो मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचाही भाग राहिला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो केरळकडून खेळतो.
यावेळी गुजरात टायटन्स नवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. गिलवर केवळ फलंदाजीचेच नव्हे तर कर्णधारपदाचेही दडपण असेल. अशा स्थितीत अनुभवी गोलंदाज शमीची अनुपस्थिती संघात निश्चितच जाणवणार आहे.
शमी आयपीएल 2023 मधील मोसमातील आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज होता. अशा परिस्थितीत शमीच्या जागी कोणता गोलंदाज शुभमन गिलला खेळण्याची संधी मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शहर
- Kalyan: कल्याणमध्ये चमत्कार! शिंदेसेना आणि ठाकरे सेना एकत्र, कोणत्या मुद्दावर झालं एकमत?
- RCB wins IPL : पुण्यात RCB समर्थकांचा जल्लोष, एफसी रोडवर राडा, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
- Pune Crime : चोरीसाठी गाजियाबाद- पुणे विमानाने प्रवास; एटीएम कार्ड बदलून लुटमारी, आंतरराज्य टोळीतील दोघे ताब्यात
- Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट, पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो? फॉरेन्सिक तपासातून सत्य बाहेर येणार
महाराष्ट्र
- Shirur Accident: आईसोबतचा तो प्रवास ठरला अखेरचा! भरधाव टेम्पोने तिघांना चिरडलं, महिलेचा जागीच मृत्यू; २ चिमुकले गंभीर
- Uddhav Thackeray : नाशिकमध्ये ठाकरेंची मोठी कारवाई, दिग्गजाची पक्षातून हकालपट्टी
- Maharashtra Rain : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत धो-धो, विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरूवात; राज्यात कुठे काय परिस्थिती?
- Seat-Sharing : मुंबई, ठाण्यात महायुतीचं बार्गेनिंग सुरू, कोण किती जागावर लढणार?
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण