Solapur ST Bus Accident : ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने एसटी बस पलटी, 9 प्रवासी गंभीर जखमी

Solapur ST Bus Accident : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा एसटी आगारची एसटी बस करमाळा -कर्जत रस्त्यावर रायगाव (ता. करमाळा) जवळ पलटी झाली असून यातील 9 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. रायगावजवळ वळणावर स्टेअरिगंचा रॉड तुटल्याने ड्रायव्हरचे नियत्रंण सुटले आणि हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.


करमाळा आगाराची करमाळा-कर्जत ही बस कर्जत वरून करमाळ्याकडे येत असताना रायगाव जवळ ही एसटी बस पलटी झाली आहे या बस मध्ये साधारणपणे 30 प्रवासी होते या प्रवाशा पैकी नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत तरी इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत जखमी मध्ये एका प्रवाशाचा हात तुटला आहे तर एक आठ वर्षीय मुलाच्या पाठीला जोराचा मार लागल्याचे सांगण्यात येत आहे.

Koregaon Bhima : अभिवादन दिनानिमित्त विजयस्तंभस्थळी ३१ डिसेंबर मध्यरात्रीपासूनच पारंपरिक कार्यक्रम; विजयस्तंभास फुलांची सजावट

प्रवाशांना बसची पुढील काच फोडून तसेच आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी बचावासाठी रायगाव परिसरातील लोकांनी सहकार्य केले अॅम्बुलन्स बोलवून जखमींना उपचारासाठी करमाळा येथे पाठवण्यात आले आहे. स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे पण हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेले नाही. या बसमधून काही विद्यार्थीही प्रवास करत होते पण त्यांना इजा झाली नाही. ते सुखरुप बाहेर पडले.
लालपरीचे अपघात वाढले

'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्य घेऊन धावणाऱ्या 'लालपरी'ची प्रवासी सुरक्षा आणि विश्वसनीयता म्हणून ओळख आहे. मात्र, आता प्रवासी सुरक्षेलाच 'तडे'जाऊ लागले आहेत. गेल्या दोन वर्षात महामंडळात तब्बल आठ हजार ६४१ अपघात झाले असून, त्यात एक हजार ६१ प्रवाशांना आपला जीव गमाववा लागल्याचे माहिती अधिकारा अंतर्गत घेतलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
ग्रामीण भागात आजही प्रवासी वाहतुकीचे साधन म्हणून एसटीलाच पसंती आहे. सरकारकडून अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना आदी सवलती मिळत असल्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. प्रशिक्षित चालक असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचा एसटीवर विश्वास कायम आहे. गेल्या दोन वर्षांत वाढत्या अपघातांच्या घटनांनी या विश्वासाला तडे जाऊ लागले आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply