Sindhudurg : मुंबई-गोवा महामार्गावर आरामबस उलटली; चार जणांचा मृत्यू, 23 जण जखमी

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महार्गावर कणकवली येथे आरामबस उलटून भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 23 जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली येथे वागदे पुलानजीक खाजगी बसला भीषण अपघात झाला आहे. पहाटे 4 वाजता हा अपघात झाला असून या अपघातात 4 ठार तर 23 जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

गडनदी पूलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. बस मुंबई ते गोवाच्या दिशेने जात होती. या बस 36 प्रवासी होते. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *