Sikkim Flood : सिक्कीमच्या महापुरात छत्रपती संभाजीनगरमधील ८ पर्यटक अडकले, संपर्क होत नसल्याने कुटुंबीय चिंतेत

Sikkim Flood : सिक्कीमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत असून ढगफुटीसदृष्य पाऊस झाल्याने तीस्ता नदीला महापूर आला. या महापुरात भारतीय लष्कराचे २३ जवान वाहून गेले. यामधील ४ जवानांचे मृतदेह सापडले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील ८ पर्यटकही सिक्कीममध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे महाराष्ट्रातील पर्यटक अटकल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरातील आठ पर्यटकांचा समावेश आहे.

Pune Accident News : पुण्यात मद्यधुंद कारचालकाने अनेक वाहनांना उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, ४ जण जखमी

सिल्लोड शहरातील जैन आणि सहारे कुटूंब पर्यटनाला सिक्कीमला गेले होते. पहिल्या दिवशी त्यांनी पाऊस जास्त असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने त्यांचे कुटूंबिय चिंतेत आहेत.

कुणाल सहारे जमाव, राजश्री कुणाल सहारे, सर्वांश कुणाल सहारे, साईशा कुणाल सहारे, स्नेहेश जैन, शीतल जैन, मोक्ष जैन, सिद्धांत जैन असे सिक्कीममध्ये अडकलेल्या पर्यटकांची नावे आहेत. हे पर्यटक सिक्कीमच्या हॉटेल यशश्री लाचुंगमध्ये अडकल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतची माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांना देण्यात आली असून प्रशासनाकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply