Shrikant Shinde : येत्या विधानसभेत महायुतीचेच सरकार येणार; खासदार श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

Shrikant Shinde : विरोधकांनी लोकांमध्ये फेक नरेटिव्ह पसरवला, तो नरेटिव्ह आम्ही पुसू शकलो नाही. लोकांनी त्याला बळी पडत एकगठ्ठा मतदान हे महाविकास आघाडीला केले. त्यामुळे त्यांचा विजय झाला मात्र ही टेम्पररी गोष्ट आहे.

लोकांची दिशाभूल करून मतदान मिळवले परंतु ही गोष्ट वारंवार करता येत नाही असा आरोप विरोधकांवर करत खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर आपला निशाणा साधला येत्या विधानसभेत महायुतीचे सरकार येणार असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

NEET-UGC : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन; लातूरमधून 2 शिक्षक ताब्यात

लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्र‌वादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाच्या वतीने कल्याण येथे खासदार सुनील तटकरे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे याच्या जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवारी आचार्य अत्रे रंगमंदिरात केले होते.

कार्यक्रमाला सुनील तटकरे काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. यावेळी राष्ट्र‌वादी, भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना खासदार शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाचे तसेच मतदानाचे गणित कार्यकर्त्यासमोर मांडले. यावेळी विरोधकांना कुठे कुठे एक गठ्ठा मतदान झाले आपण कुठे कमी पडलो याचाही थोडक्यात आढावा सागितला.

विरोधकांवर टीका करताना लोकांची दिशाभूल करत मतदान मिळवल्याचा आरोप खासदार शिंदे यानी केला तसेच ठाकरे पिता पुत्रांवर सडकून टीका केली

विरोधकांनी संविधान खतरे में, संविधान बचाव अशा सगळ्या खोट्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या. लोकानी त्याला बळी पडून हे एकगट्टा मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलं.

त्याच्यामुळे त्यांचा विजय झाला असेल. मात्र ही टेम्पररी गोष्ट आहे, ही पर्मनंट अरेंजमेंट नाही. लोकांची दिशाभूल करून लोकाच मतदान मिळवले. लोकांची दिशाभूल एकदा करू शकतात. वारंवार दिशाभूल होत नसते. येणाऱ्या विधानसभेला महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा महायुती सरकार महाराष्ट्रात येईल असा विश्वास व्यक्त केला.

मराठी माणूस खरी खऱ्या शिवसेनेच्या बाजूने उभा राहिला श्रीकांत शिदे यांचा आदित्य ठाकरेंना टोलावरळी मतदारसंघात 40 हजार पेक्षा जास्त मताधिक्य मिळेल असं त्यांना वाटत होत मात्र लोकांनी त्याची जागा दाखवून दिली. वरळी मतदारसंघात फक्त 6 हजार मताधिक्य आल. त्याना वाटत होत मराठी माणूस त्याच्यासोबत आहे.

मात्र मराठी माणूस खऱ्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या बाळासाहेबाच्या विचाराच्या बाजूने उभा राहिला आणि त्यांनी मतपेटीतून दाखवून दिलं. म्हणून 19% जे मतदान शिवसेनेला होत होत त्यातील साडे 14 टक्के मतदान हे खऱ्या शिवसेनेला धनुष्य बाणाला पडल. असा टोला खासदार श्रीकांत शिंद यांनी आदित्य ठाकरे याना लगावला.

त्याच लोकानी पैसे वाटण्याचे काम केलं श्रीकांत शिंदे यांचा सुषमा अंधारेवर पलटवार सुषमा अंधारे यानी शिवसेना शिंदे गटाकडून पदवीधर मतदारसंघात पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता. याबाबत बोलताना ओकत शिंदे यांनी त्याच्याच लोकांचे कुठे कुठे पैसे वाटण्याचे काम चालू आहे असा पलटवार केला.

आदित्य ठाकरे वरळीत उभे राहतात की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधतात हे पहाव लागेल श्रीकात शिंदे याचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

वरळीत कमळ फुलणार नाही अस वक्तव्य आदित्य ठाकरे यानी केल होत. याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे यानी पुढच्या वेळेस आदित्य ठाकरे वरळीत उभे राहतात की नाही तोच एक मोठा प्रश्न आहे? की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधतात हे पहाव लागणार असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांना लगावला.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply