Shraddha Murder Case : आरोपी आफताबची होणार नार्को टेस्ट; कोर्टानं दिली परवानगी

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्येनंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. या ह्त्येमध्ये आरोपी आफताबच्या निर्दयीपणाचीदेखील खूप चर्चा केली जात आहे. या धक्कादायक घटनेनंतर अवघा देश हादरून गेला आहे. तपासात अनेक धक्कादायक खुलासे केले जात आहेत.

वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीची दिल्लीत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तरुणीचा लिव्ह-इन पार्टनर अफताब पूनावाला याची दिल्ली पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. आफताबच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे देखील समोर आले आहेत. अफताबने अत्यंत थंड डोक्याने आणि पद्धतशीर नियोजन करून श्रद्धाची हत्या घडवून आणली. इतकंच नाही तर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असली तरी शेवटपर्यंत तिचं शीर फ्रिजमध्येच ठेवून दिलं होतं. त्यानंतर शरीराचे 35 तुकडे वेगवेगळ्या जागी फेकल्यानंतर शेवटी शीर फेकून दिलं.

दरम्यान पोलिस तिच्या अवयवांची तपासणी करत आहेत. परंतु अद्याप तिचे शीर आणि अवयव कापलेला चाकू आणि इतर समान सापडले नाही. अशातच तो खोटी माहिती देऊन फसवणूक करू शकतो यामुळे पोलिसांनी आरोपी आफताबच्या नार्को टेस्ट करण्याची मागणी दिल्ली न्यायालयाकडे केली होती. पोलिसांना तपासात सहकारी करत नसल्याची तक्रार पोलिसांनी केली होती.

या घटनेची क्रूरता आणि वास्तव पाहता ही नार्को टेस्ट महत्वाची मानली जात आहे. यामधून बऱ्याच गोष्टी समोर येऊ शकतात. आफताबच्या नार्को टेस्टसाठी दिल्लीच्या साकेत कोर्टाने परवानगी दिली आहे. पोलिसांनी आरोपीच्या नार्को टेस्टसाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply