मुंबई : धक्कादायक: हॉटेलमध्ये आढळला ७ वर्षीय मुलीचा कुजलेला मृतदेह, आई गंभीर जखमी

मुंबई : मीरा रोड येथील काशी मीरा परिसरात असलेल्या सीजन हॉटेलमध्ये सात वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीजन हॉटेलमध्ये ७ वर्षीय मुलीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना आढळून आला. तसंच मुलीची आई गंभीर जखमी अवस्थेत दिसून आली आहे.

मयत मुलीचे वडील हॉटेलमधून बाहेर निघून गेले, तेव्हा हॉटेल रूममधून मुलीची आई मदतीसाठी ओरडू लागली. हॉटेलमधील (Hotel) कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीच्या मदतीने दरवाजा खोलला तेव्हा त्यांना संपूर्ण प्रकार कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला.

या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी तात्काळ काशी मीरा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. गंभीर जखमी झालेल्या मुलीच्या आईला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, ७ वर्षीय मुलीचा मृतदेह शवविच्छेदना साठी पाठवण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेत वडील फरार असून, पुढील तपास काशी मीरा पोलीस करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *