Shocking News : होणाऱ्या बायकोचा दुसऱ्यावर जीव जडला, तरुणाला देऊ लागली धमक्या; तणावात येऊन आत्महत्या


Shocking News : नाशिकमध्ये आयकर विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. होणाऱ्या बायकोकडून वारंवार मिळणाऱ्या धमक्यांना कंटाळून या अधिकाऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. हरेकृष्ण पाण्डेय (३५ वर्षे) असं या अधिकाऱ्याचे नाव असून ते उत्तर प्रदेशचे होते. या अधिकाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, हरेकृष्ण पाण्डेय असं आत्महत्या करणाऱ्या इन्कम टॅक्स अधिकाऱ्याचे नाव आहे. हरेकृष्ण नाशिकमध्ये आयकर विभागात इन्स्पेक्टर पदावर कार्यरत होते. त्यांचे वाराणसी येथील एका तरुणीसोबत लग्न ठरले होते. काही दिवसांपूर्वी त्यांचा थाटामाटात साखरपुडा देखील पार पडला. पण साखरपुड्यानंतर त्यांची होणारी बायको दुसऱ्याच तरुणाच्या प्रेमात पडली.

हरेकृष्ण यांना आपल्या होणाऱ्या बायकोच्या प्रेमसंबंधाबद्दल कळाले तव्हा त्यांनी तिच्याकडे विचारणा केली. तेव्हा तिने त्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. वारंवार त्यांची होणारी पत्नी धमक्या देत होती. यामुळे हरेकृष्ण पाण्डेय प्रचंड दबावाखाली आले होते. तणावाखाली येऊन अखेर त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. हरेकृष्ण यांच्या कुटुंबीयांना त्याच्या आत्महत्येचे वृत्त कळवण्यात आले आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply