Shocking News : इसिसमध्ये सहभागी होण्याच्या संशयावरून आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्याला अटक; काळा झेंडा आणि ईमेलचा तपास सुरू

Shocking News : आयआयटी-गुवाहाटीचा एक विद्यार्थी कथितरित्या दहशतवादी संघटना इसिसमध्ये सामील होणार होता. त्याला शनिवारी संध्याकाळी पोलिसांनी आसाममधील हाजो येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. हा विद्यार्थी मूळचा दिल्लीचा असल्याची माहिती मिळत आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.

आसाम पोलिसांनी आयआयटी गुवाहाटीच्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. तो इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होणार होता, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला  आहे. त्याला शनिवारी (२३ फेब्रुवारी) संध्याकाळी आसाममधील हाजो येथे ताब्यात घेण्यात आलं आहे. इसिस इंडियाचा प्रमुख हरीश फारुकी उर्फ ​​हरीश अजमल फारुकी आणि त्याचा सहकारी अनुराग सिंग उर्फ ​​रेहान यांना धुबरी जिल्ह्यात अटक केल्यानंतर चार दिवसांनी या विद्यार्थ्याला पकडण्यात आलं आहे.

Moscow Attack : मॉस्को हल्ल्यामागे या देशाचा हात; पैसा, शस्त्रं कुठून आली? पुतीन यांनी दिली चेतावनी

ताब्यात घेतलेला विद्यार्थी हा मूळचा दिल्लीचा असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस महासंचालक जीपी सिंह यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितलंय की, विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याची सध्या चौकशी (ISIS) सुरू आहे. चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी सांगितलं की ईमेल मिळाल्यानंतर या विद्यार्थ्याची चौकशी सुरू करण्यात आली होती. या विद्यार्थ्याने पाठवलेल्या ईमेलमध्ये तो ISIS मध्ये सामील होणार असल्याचा दावा केला होता.

ई-मेल मिळताच आसाम पोलिसांनी आयआयटी-गुवाहाटीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. हा विद्यार्थी दुपारपासून बेपत्ता असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्याचा मोबाईल फोनही बंद असल्याचं समोर आलं. या विद्यार्थ्याचा शोध पुन्हा घेण्यात आला. सायंकाळी स्थानिक लोकांच्या मदतीने त्याला गुवाहाटीपासून 30 किमी अंतरावर असलेल्या हाजो परिसरातून पकडण्यात आलं आहे.

प्राथमिक चौकशीनंतर त्याला एसटीएफ कार्यालयात आणण्यात आलं आहे. पोलीस त्या संशयित ई-मेलच्या पार्श्वभूमीवर पोलीस तपास करत आहेत. त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत 'कथितपणे ISIS सारखा दिसणारा' काळा झेंडा सापडला  आहे. संबंधित संघटनांशी व्यवहार करणाऱ्या विशेष एजन्सीकडे हा ध्वज तपासासाठी पाठवण्यात आला आहे. या विद्यार्थ्याकडून इतर काही साहित्यही जप्त करण्यात आलंय. या प्रकरणाशी संबंधितप्रत्येक गोष्टीची चौकशी केली जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply