Shiv Sena Symbol Row : शिवसेना नाव अन् चिन्ह शिंदे गटाला का दिलं? निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात सांगितलं

Shiv Sena Symbol Row : राज्यातील सत्तासंघर्षावर सुरु असलेली सुप्रीम कोर्टातील सुनावणी अखेरच्या टप्प्यात पोहचली आहे. लवकरच सर्वोच्च न्यायालयाकडून याबद्दलचा निकाल दिला जाऊ शकतो. यादरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्यात आल्यावर उद्धव ठाकरे गटाकडू घेण्यात आलेल्या आक्षेपावर सर्वोच्च न्यायालयात उत्तर दिलं आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हा एकनाथ शिंदे यांच्या गटाला देत उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिला होता. याविरोधात उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये उत्तर दाखल केले आहे.

उत्तरात काय म्हटलंय?

दाखल करण्यात आलेल्या उत्तरात निवडणूक आयोगाने शिंदे गटाला चिन् देण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे, हा एक तर्कसंगत आदेश होता आणि उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांचा यामध्ये समाधान करण्यात आले आहे असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. अर्ध-न्यायिक क्षमता म्हणून हा आदेश पारित केल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. म्हणजेच या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागता येते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply