Shirur Loksabha election 2024 : प्रचारसाहित्य घेऊन पोलिंग एजंट मतदान केंद्रात? शिरुरमधल्या मांजरी केंद्रातील प्रकार, कोल्हेंचा आरोप

Shirur Loksabha election 2024 : प्रचार साहित्य घेऊन पोलिंग एजंट मतदान केंद्रात थांबल्याचा प्रकार घडला असून त्यामुळे मतदान केंद्रात गोंधळ उडाल्याची परिस्थिती निर्माण झाली. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी सोशल अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर करत असा आरोप केला.

''मांजरी ( हडपसर विधानसभा) शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रशासनाची अनागोंदी..! सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजेंट बनून सरळसरळ थेट मतदान केंद्रात मनमानी कारभार करत आहेत!'' अशी पोस्ट अमोल कोल्हे यांनी इन्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करत त्यासोबत गोंधळ झालेला व्हिडीओ शेअर केला आहे.

Chhatrapati Sambhajinagar : गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या १९ वर्षीय इंजीनिअरिंग विद्यार्थिनीचा पर्दाफाश, सापडला लाखोंचा ऐवज

खासदार अमोल कोल्हे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मतदान केंद्रातील कर्मचारी एका एजंटवर भडकेलेल दिसत आहेत. ''तू कोणाचा माणूस आहेस?'' असं विचारल्यानंतर तो तरुण मी शिवाजीराव आढळराव पाटलांचा एजंट असल्याचं सांगत आहे.

''प्रचारसाहित्य घेऊन हा माणूस आतमध्ये कसा आला?'' असा प्रश्न कर्मचारी करत आहेत. पोलिसांवरही प्रश्न उपस्थित करुन चेकिंग झाली नाही का?, असं विचारण्यात आलं.

दरम्यान, या प्रकरणी अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रियादेखील दिली असून मांजरी मतदान केंद्रात गंभीर प्रकार घडल्याने आक्षेप व्यक्त केला. या प्रकरणाची तक्रार करणार असल्याचंही कोल्हेंनी सांगितलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply