Shirur Latest News : आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा; गरोदर मातेच्या पोषण आहारात आढळली कीड

Shirur Latest News : पुणे जिल्ह्यातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून गरोदर महिलेला दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात अळ्या आणि सोनकीडे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागाच्या गरोदर महिलांच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यतील शिरूर तालुक्यातील आंबळे गावातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आंबळे गावातील आरोग्य विभागात गरोदर असणाऱ्या बालकाची उत्तम प्रकारची शक्ती मिळावी, यासाठी शासनाचा पोषक आहार म्हणून किट देण्यात येतो. मात्र, या किटमध्ये बदाम, खारीक,काजू , गूळ आणि इतर पोषण आहाराचा समावेश आहे. या आहारातील गुळ आणि काजूमध्ये किडे आढळले आहे.

Raj Thackeray : भूमिका बदलली नाही, धोरणावर कायम; राज ठाकरे

गरोदर महिलांना निकृष्ट दर्जाचा आहार दिल्याचे समोर आले आहे. गरोदर माता आणि बाळाचे आरोग्य चांगले राहावे. त्यांची चांगली काळजी घेण्यासाठी आरोग्य बाळाचे आरोग्य चांगले राहावे. बाळाची चांगली काळजी घेण्यासाठी या उपक्रमाला पुरवठादाराकडून तिलांजली दिली जात असल्याचा आरोग्य विभागाचा हलगर्जीपणाचा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोग्य विभागाकडून गरोदर मातेच्या आरोग्याशी खेळ होतोय का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

या घटनेवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, 'पोषण आहाराच्या नावाखाली गरोदर माता, अंगणवाडीत अचानक छापेमारी केल्यास सर्व ठिकाणी निकृष्ट आणि आजारी पडाल असा माल आहे. सोनकीडे आणि अळ्या आढळणे ही पहिली बाब नाही. शिरूरमधील घटनेचे पुरावे आढळले, तरी त्याच्यावर कारवाई होत नाही. सरकारला त्यांचेच प्रश्न सुटलेले नाहीत. त्यांना गरोदर मातेच्या प्रश्नाशी देणेघेणे नाही. निवडणूक, जागावाटप यामध्ये ही सर्व माणसे गुंतली आहेत'.

'आरोग्य यंत्रणेचा कारभार खिळखिळा झाला आहे. या योजनेचा नाव पोषण आहार आहे. मात्र, पोषक घटक नाही. कुठल्याही अंगणवाडीत खिचडी की रवा असतो हे काही कळत नाही,अशी टीका अंधारे यांनी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply