Shirpur Crime News : अज्ञातांकडून झालेल्या गोळीबारात प्राध्यापक गंभीर; शिरपूर तालुक्यातील घटना

Shirpur Crime News : शिरपूर तालुक्यातील हिंगणी गावाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी प्राध्यापकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये प्राध्यापक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
 
शिरपूर येथील एसपीडीएम कॉलेजचे प्राध्यापक दिनेश पाटील हे त्यांच्या बहिणीला भेटण्यासाठी शहादा येथे गेले होते. बहिणीची भेट घेऊन ते रात्री शिरपूरकडे परत येत होते. याचवेळी मार्गावरील तहार्डी गावाजवळ मागून एका दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी काहीही कारण नसताना गोरीबार केला. यात प्राध्यापक पाटील यांच्या पाठीत व पोटात गोळी लागली. काही अंतरावर असलेल्या गावाजवळ ते पोहोचले असता त्यांची परिस्थिती बघून गावकऱ्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.  
 
त्यानंतर या संदर्भात पोलिसांना  या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. परंतु हा गोळीबार करण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस प्रशासनतर्फे या आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे, या संदर्भात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.
 
 
 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply