Shirpur Crime : कामाचे पैसे मागितल्याचा राग; चार- पाच जणांकडून तरुणाला बेदम मारहाण

Dhule : कामावर गेल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून पैसे देण्यास वारंवार मागणी केल्यानंतर देखील टाळाटाळ केली. दरम्यान कामाचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून ठेवला होता. याच दरम्यान पैसे मागणाऱ्या तरुणाला बोलावून चार ते पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शिरपूर येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून याची चौकशी सुरु आहे.

शिरपूर शहरात हा प्रकार घडला आहे. कामावर गेल्यानंतर काम केल्याच्या मजुरीचे पैसे काहीजण तातडीने देत असतात. मात्र काम पूर्ण होऊन बऱ्याच दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर देखील आपल्या हक्काचे पैसे मिळत नव्हते. यामुळे सदर तरुणाने संबंधित व्यक्तीकडे पैशांची मागणी करत कामाचे पैसे लवकरात लवकर देण्याची मागणी संबंधित व्यक्तीकडे केली होती. मात्र पैसे का मागतोय? याचा राग मनात होता.

Fraud : शेतकऱ्यांच्या नावावर लोन काढून फसवणूक; जय किसान मशीनरीच्या संचालकावर गुन्हा दाखल

बोलावून घेत केली मारहाण

वारंवार पैसे मागत असल्याचा राग अनावर झाल्यानंतर संबंधिताने तरुणास एका ठिकाणी बोलावून घेतले. यानंतर पैसे का मागतोस? अशी विचारणा करत त्या तरुणास चार ते पाच जणांनी एकत्रित येऊन जबर मारहाण केली आहे. या मारहाणीत तरुणाला मोठ्या प्रमाणात मार लागला असून तरुणाने शिरपूर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.

मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद

चार ते पाच जणांनी मिळून मारहाण केल्याची घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. दरम्यान मारहाण झालेल्या तरुणाने पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांकडून याचा तपास सुरु करण्यात येत आहे. या सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे शिरपूर पोलीस पुढील तपास करीत असून मारहाण करणाऱ्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply