Shimla Landslide : शिमल्यातील शिव मंदिर कोसळून 9 जणांचा मृत्यू; काही जण अडकल्याची भीती

Himachal Pradesh Rain: गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. सोमवारी सकाळी येथील शिमला शहरात एक मोठी भूस्खलनाची घटना घडली. शिमल्यातील शिव बावड़ी मंदिर येथे हे भूस्खलन झालं असून या घटनेत आत्तापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे तर आणखी ढिगाऱ्याखाली 35 ते 40 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, श्रावण महिन्यातील सोमवार असल्याने या मंदिरात शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान मंदिरात भूस्खलनाची घटना घडली. मुसळधार पावसामुळे शिव बावडी येथील मंदिरावर दरड कोसळली. त्यामुळे मंदिरात उपस्थित २५ हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.

आतापर्यंत २ मुलांसह ५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच उर्वरितांचा शोध सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांचा सध्या शोध सुरू असून सतत सुरू असलेल्या पावसामुळे बचावकार्यामध्ये अडचणी येत आहेत.

Ahmednagar Accident : सहलीहून परतताना मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात

मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती...

हिमाचलचे मुख्यमंत्री सुकविंदर सिंग यांनी याबाबत बोलताना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने सर्व जण दर्शनासाठी आले होते. सेना, पोलिस आणि एनडीआरएफच्या मदतीने लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply