
मुंबई: राज्यात शिवसेना आमदारांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४२ आमदारांनी बंड केले आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीमधील एका हॉटेलमध्ये आहेत. आज पुन्हा पाच आमदार गुवाहाटीत गेले आहेत. मंत्री दादा भुसे आणि आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय राठोड, अपक्ष आमदार गीता जैन, किशोर जोडगेवार हे आता गुवाहाटील पोहोचले आहेत.
शिवसेनेचे आमदार कृषी मंत्री दादा भुसे, आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) आणि आमदार रवींद्र फाटक गुवाहाटी येथील रेडीसन ब्लू हॉटेलमध्ये पोहोचले आहेत, त्यांनीही आता एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे आता शिंदे गटातील आमदारांची संख्या वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
बीएमसी निवडणुकीआधी बंड होईल याची कल्पना होती
राज्यात शिवसेना आमदारांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४२ आमदारांनी बंड केले आहे, त्यामुळे आता राज्यातील सरकार अडचणीत आले आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 'मुंबई महापालिका निवडणुकांच्या अगोदर अस होणार याची आम्हाला कल्पना होती, अस पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
आमचा अंदाज असा होता की, मुंबई महापालिकाअगोदर अस काहीतरी होणार. शिवसेनेला संपवून मुंबई महापालिकेवर सरकार आणणे महत्वाचे आहे, यासाठी दिल्लीच्या सूचनेवर हे सगळं करण्यात आले आहे. कारण मुंबई महापालिका सर्वात मोठी महापालिका आहे, म्हणून देवेंद्र फडणवीस दिल्लीवरुन आदेश घेऊन येत होते.
या अंदाजामुळे आम्ही सावध होतो, पण त्यांनी मोठा खेळ केला. ईडीचा वापर करुन आमदारांना फोडले, लोकशाहीला काळीमा लावण्याचे काम केले आहे. शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर बोलताना चव्हाण म्हणाले, अजून या संदर्भात आमच्यात काही चर्चा झालेली नाही.
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला



























Subscribe to my channel
