Shashikant Warishe : मोठी बातमी! पत्रकार शशिकांत वारिशेंचा अपघात जाणीवपूर्वक घडवला; विधानपरिषदेत सरकारची कबुली

Shashikant Warishe :  रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील 'महानगरी टाईम्स' वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिसे यांचा मंगळवारी (7 फेब्रुवारी) अपघाती मृत्यू झाला होता.मात्र त्यांचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. याबद्दलच्या तपास सुरू असतानाही अनेक संशयास्पद बाबी आढळून आल्या होत्या.

याबद्दल विधिमंडळ अधिवेशनात महत्वाचा खुलासा झाला असून शशिकांत वारिसे यांची जाणीवपूर्वक अपघात घडवून आणल्याची कबुली राज्य सरकारने दिली आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. यामध्ये पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी राज्य सरकारने मोठा खुलासा केला आहे. शशिकांत वारिशे यांच्या अपघाती मृत्यूबद्दल विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर राज्य सरकारने लेखी उत्तर दिले आहे. ज्यामध्ये शशिकांत वारिशे यांची जाणीवपूर्वक नाणार परिसरात वाहन अपघात घडवून आणला, असं राज्य सरकारने विरोधकांच्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरामध्ये म्हटलं आहे. तसंच सध्या या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू असल्याची माहितीही दिली आहे.

दरम्यान, राजापूर येथे ठिकाणी पेट्रोल पंपावर 'थार' गाडीनं शशिकांत वारिसे यांच्या दुचाकी वाहनाला जोरात धडक दिली होती. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी या प्रकरणातला आरोपी पंढरीनाथ आंबेरकर यानेही वारिशेंवरचा हल्ला पूर्वनियोजित असल्याची कबुली दिली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply