Share Market : 2024 मध्ये मोदी सत्तेवर आले नाही तर शेअर बाजारात 25 टक्के घसरण होईल; जेफरीजचा अंदाज

Share Market : 2024 च्या लोकसभा निवडणुकीला काही महिनेच शिल्लक आहेत. निवडणुकीचे निकाल काय लागतील? सत्तापरिवर्तन होणार की नाही? स्थिर सरकार येणार की नाही? या सर्व गोष्टींचा परिणाम शेअर बाजारावर होत असतो.

यातच आता अमेरिकन गुंतवणूक बँक जेफरीज एलएलसीकडून एक अंदाज व्यक्त केला आहे. जेफरीज एलएलसीच्या इक्विटी स्ट्रॅटेजीचे ग्लोबल हेड ख्रिस वुड यांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पक्ष लोकसभा निवडणुकीत सत्तेवर आला नाही, तर भारतातील इक्विटी मार्केटमध्ये मोठी घसरण होईल.

Pandharpur News : मराठा आरक्षणासाठी वारकरी आता विठुरायाच्या चरणी, जरांगे यांच्या गावातील महिलांनी देवाला घातले साकडे

 

शेअर बाजार 25 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता

ख्रिस वुड म्हणाले की, भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवर आला नाही तर भारतीय शेअर बाजारात 25 टक्क्यांनी घसरण होऊ शकते. वुड म्हणाले की, मोदी सरकारने जागतिक पुरवठा साखळीला आकर्षित करण्यासाठी अनेक सुधारणा केल्या आहेत. ख्रिस वुडने बिझनेस स्टँडर्डच्या एका इव्हेंटमध्ये असे भाष्य केले आहे.

2004 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला पराभवाला सामोरे जावे लागले होते. भाजपच्या पराभवानंतर शेअर बाजारात पुढच्या 2 दिवसांत 20 टक्क्यांची घसरण झाली होती.

मात्र, तत्कालीन काँग्रेस सरकारने दक्षिण आशियाई अर्थव्यवस्था खुली करण्यासाठी तयार केलेली धोरणे कायम ठेवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर पहिल्या 2 दिवसांचे नुकसान काही प्रमाणात सावरण्यात बाजाराला यश आले होते.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply