Sharad Pawar Resigns: शरद पवारांच्या पुण्यातील घराबाहेर बंदोबस्त वाढवला, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा निर्णय

Baramati Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा काल अचानक राजीनामा दिली. लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा होता. या कार्यक्रमात शरद पवारांनी आपल्या कारकिर्दीबाबत चर्चा केली. त्यानंतर शेवटी आपण अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. दरम्यान या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांना शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयाचा धक्का बसला.

निवृत्तीच्या निर्णयानंतरआता शरद पवार यांचे बारामती येथील गोविंद बाग निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. सध्या शरद पवार यांच्या गोविंद बाग निवासस्थानी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

पुण्यात बॅनर्सची चर्चा

शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मनधरणी केली. त्यानंतर दोन ते तीन दिवसात विचार करुन निर्णय कळवतो असा निरोप शरद पवारांनी अजित पवारांकरवी दिला आहे. अशात पुण्यात लागलेल्या बॅनर्सची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून शरद पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती करणारे बॅनर लावण्यात आला आहे.

साहेब, निवृत्त पदाधिकारी होत असतात. जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जनतेच्या मनातील राजे नव्हे. आज महाराष्ट्रच तर अवघ्या देशाला आपल्या नेतृत्वाची गरज आहे. कृपया आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा. पवार साहेब म्हणजेच राष्ट्रवादी, राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवारअसं बॅनर पुण्यात लागलं आहे त्यामुळे आता शरद पवार नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply