Sharad Pawar resigns as NCP chief : पवारांच्या राजीनाम्यानंतर सिल्वर ओक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानावर चोख पोलीस बंदोबस्त

मुंबई : राज्यसभा खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली. दक्षिण मुंबईतील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पक्षाचे नेते आणि आमदारांचे आगमन सुरू झाले. दरम्यान, शरद पवार यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दुसरीकडे या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काहीसे त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये या साठी पोलिसांनी त्वरित शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथे चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. परिस्थिती हाताळण्यासाठी या झोनचे पोलीस उपायुक्त तसेच स्थानिक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः उपस्थित होते.

सोबतच परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त दलाला पाचारण करण्यात आले होते. सिल्वर ओक यासोबतच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी सुद्धा बंदोबस्त वाढवलेला होता . यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा यासाठी प्रतीकात्मक आंदोलन करत होते या ठिकाणी सुद्धा पोलिसांनी बंदोबस्त लावलेला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply