Sharad Pawar: वाघ हा वाघ असतो, तो कधीच म्हातारा होत नसतो; शरद पवारांच्या सभेआधी जळगावात झळकले बॅनर्स

Sharad Pawar Jalgaon Sabha: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची जळगावमध्ये आज जंगी सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांची ही चौथी सभा असून जळगावमधील पहिलीच सभा आहे.

एकीकडे राज्यात पेटलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न, जालन्यातील मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेला लाठीमार, या घटनांवरून राज्याचं राजकारणं ढवळून निघालं आहे. त्यामुळे आजच्या सभेत शरद पवार नेमकं काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. 

दरम्यान, शरद पवार  यांच्या सभेआधी जळगाव राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात ठिकठिकाणी त्यांच्या स्वागतांचे बॅनर्स लावले आहेत. वाघ हा वाघ असतो तो कधीच म्हातारा होत नाही, सत्तेसाठी नाही साहेबांच्या सन्मानासाठी आम्ही सारे साहेबांच्या पाठीशी, असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला आहे.

Maratha Reservation : मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षणाला शरद पवारांचा विरोध; सांगितला नवा तोडगा

राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनर्सच्या माध्यमातून अजित पवार गटाला  डिवचण्याचा प्रयत्न केल्याने सध्या हे बॅनर्स शहरात चर्चेचा विषय बनले आहेत. दरम्यान, शरद पवार दुपारी १२ वाजेच्या सुमारास जळगावात दाखल झाले असून त्यांच्या स्वागतासाठी नेते तसेच कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली आहे.

शरद पवार जळगावमध्ये येताच राष्ट्रवादीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन देखील करण्यात येत आहे. जळगावातील अजिंठा चौफुलीवर शरद पवार यांचे भव्य स्वागतची तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या वतीने जळगाव शरद पवारांच्या स्वागतासाठी तब्बल ५ ते ६ जेसीबीच्या साह्याने भव्य अशी पुष्पृष्टी करण्यात आली आहे.

त्याचबरोबर शरद पवार यांना सहा क्विंटलचा हार देखील घातला जाणार आहे. दरम्यान, जळगावमध्ये पोहचताच शरद पवार यांनी पत्रकारपरिषद घेत केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. ‘इंडिया’ हे नाव हटवण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं शरद पवारांनी ठणकावून सांगितलं आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांनी मराठा आंदोलकांची माफी मागणं, लाठीमाराची कबुलीच असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply