Sharad Pawar : आज बीडमध्ये शरद पवारांची तोफ धडाडणार; 27 ऑगस्टला अजित पवारांची उत्तर सभा

Beed News: आज बीडमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तोफ धडाडणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांची राज्यातील दुसरी आणि मराठवाड्यातील पहिली सभा आज बीडमध्ये होत आहे. आज आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वतीने भव्य रॅलीने पवारांचे स्वागत होणार आहे. 

या सभेसाठी शरद पवार हे छत्रपती संभाजी नगर येथून सकाळी 9:30 वाजता बाय कार बीडकडे प्रयाण आहेत. तर 12:30 वाजता बीड शहरात दाखल होणार आहेत. यादरम्यान बीड बायपास जवळील महालक्ष्मी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे.

दुपारी 2 ते 4 पर्यंत शरद पवार हे सभास्थळी असणार असून यादरम्यान ते जाहीर सभेतून विरोधकांवर तोफ डागणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता ते बीडहुन छत्रपती संभाजी नगर निघतील. दरम्यान या सभेतून शरद पवार हे नेमकं काय बोलणार ? याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे.

Beed News : धनंजय मुंडे यांच्या होम पीचवर शरद पवारांची सभा, बीडमध्ये राजकारण तापलं...

अजित पवारांची होणार उत्तर सभा

शरद पवारांची बीडमध्ये सभा पार पडल्यानंतर 27 ऑगस्टला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये उत्तर सभा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शरद पवारांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची चर्चा झालीये. शरद पवारांची सभेनंतर उत्तर सभेचं धनंजय मुंडे यांच्यावतीने अयोजन करण्यात येईल अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *