Sharad Pawar : टीम इंडियाच्या विजयाची तुलना सर्जिकल स्ट्राईकशी, द्रविड गुरुजींचं कौतुक, शरद पवार वर्ल्डकप जिंकल्यानंतर काय म्हणाले?

Sharad Pawar : भारतीय संघाने शनिवारी रात्री बार्बाडोसच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ट्वेन्टी-20 विश्वचषकावर नाव कोरले होते. या विजयानंतर टीम इंडियावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार  यांनीही पुण्यात बोलताना टीम इंडियाच्या कामगिरीचे कौतुक केले. भारतीय संघाच्या या विजयात काहीजणांनी सर्जिकल स्ट्राईकसारखा चमत्कार दाखवला, कोणी चांगला झेल घेतला. या सगळ्यामुळे आपण विश्वचषक स्पर्धेतील   विजयाचा दुष्काळ संपवला, असे शरद पवार यांनी म्हटले. 

भारतीय संघाला अत्यंत उत्तम शिक्षक मिळाला. द्रविड यांची कामगिरी महत्त्वाची आहे. द्रविड यांनी दिलेले योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी दिलेले सल्ले यामुळे सामूदायिक यश मिळाले, असेही शरद पवार यांनी सांगितले. 

Mumbai News : मुंबई विशेष सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांची बदली; शिखर बँक घोटाळा प्रकरणात सुनावणार होते निकाल

विराट कोहली आणि रोहित शर्माची ट्वेन्टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती, शरद पवार म्हणाले...

विराट कोहली आणि रोहित शर्मा ट्वेन्टी-20 क्रिकेटमधून निवृत्त होत आहेत. दोन्ही खेळाडू अतिश्य उत्तम आहेत. फॉर्ममध्ये असतानाच रिटायरमेंट घेणं योग्य असते. दोघांचंही जागतिक क्रिकेटमध्ये मोठं योगदान आहे.  नव्यांना संधी मिळावी, माझ्या मते हा निर्णय योग्य. सचिन तेंडुलकर निवृत्त झाले आणि अनेकांना प्रोत्साहित  केले. या दोघांचा निर्णय बरोबर असून मी त्यांचं अभिनंदन करतो, असे शरद पवार यांनी म्हटले.

सुर्यकुमार यादवचं शरद पवारांकडून कौतुक

एकेकाळी जगाच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचं वेगळं स्थान होतं. अलीकडे भारतीय संघाने आपले वेगळे स्थान निर्माण केले. ट्वेन्टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला अधिक वेळ लागला. विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला अधिक वेळ लागला. भारतीय टीमने अद्भुत प्रकारचा चमत्कार केला. सुरुवातीला धावसंख्या पाहिल्यानंतर चिंता वाटावे अशी स्थिती होती. जसप्रीत बुमरा  आणि सुर्यकुमार यादव चांगली कामगिरी केली, असेही शरद पवार यांनी म्हटले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply