Sharad Pawar : ‘लोकसभे’पर्यंत थांबा; देशभरातील राष्ट्रीय नेत्यांची पवारांना साद

मुंबई : भाजपविरोधात समविचारी पक्षांची मोट बांधण्याची क्षमता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर देशभरातील स्वपक्षीय नेत्यांसह इतर समविचारी पक्षांची कोंडी झाली आहे.

पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी भूमिका देशभरातील भाजपविरोधी पक्षांची असून, जर त्यांना निर्णयावर ठाम रहायचे असेल, तर किमान २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी निर्णय मागे घ्यावा अशी, या नेत्यांची भूमिका असल्याचे समजते.

शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर इतर राज्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी, एम. के. स्टॅलिन यांनीही पवारांशी संपर्क साधत विचारणा केल्याचे सांगण्यात येते. पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा अशीच भावना भाजपविरोधात देशपातळीवर काँग्रेससह जे जे पक्ष एकत्र येत आहेत त्या सर्व पक्षांच्या नेत्यांची आहे.

राष्ट्रवादीच्या केरळ, मेघालय, हरियाना, बिहार, गुजरात, मणिपूर, लक्षद्वीप, गुजरात, नागालँण्ड येथील प्रदेश नेत्यांनाही या निर्णयाचा धक्का बसला असून, राष्ट्रवादीच्या विविध राज्यांतील नेत्यांसोबत पवारांची उद्यापासून (ता.५) प्रत्यक्ष चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

समितीची आज बैठक

नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी शरद पवार यांनी नेमलेल्या समितीची शुक्रवारी सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी भवनमध्ये बैठक आहे. या समितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे,

छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, एकनाथ खडसे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपदापासून दूर जाऊ नये, यावर चर्चा होऊन ठराव होईल असे संकेत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply