Sharad Pawar : 'हे धक्कादायक, पालकांनी विचार करावा', अभ्यासक्रमात मनुस्मृती, श्लोक समावेशाच्या चर्चांवर शरद पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar : नुकताच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा ‘एससीईआरटी’ने जाहीर केला. यामध्ये राज्य मंडळांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मनाचे श्लोक, तसेच आराखड्यामध्ये मनुस्मृतीतील श्लोकाचा समावेश करण्याबाबतच्या सूचना दिल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. या निर्णयावरुन नवा वाद उभा राहिला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या निर्णयावरुन महत्वाचे विधान केले आहे.

PM Modi : मुस्लिमांच्या 77 जातींना सगळीकडे मलाई मिळत होती, पण...; पंतप्रधान मोदींचे आरक्षणावर भाष्य

काय म्हणाले शरद पवार?

मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मनुस्मृतीबाबतच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. "अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि मनाचे श्लोक समाविष्ठ करण्याचा विचार असल्याचे माझ्या वाचण्यात आले. यावरुन राज्य सरकारची काय मानसिकता आहे, हे लक्षात येते. मुलांच्या डोक्यात काय घालायचे सुरू आहे हे समजत नाही. पण जाणकरांनी याबाबत भूमिका घ्यायला हवी. हे धक्कादायक आहे," असे म्हणत शरद पवार यांनी या निर्णयाला विरोध केला.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply