Sharad Pawar : “राजकारणात बालबुद्धी असलेले लोक”, अजित पवारांच्या त्या विधानावर शरद पवारांचा टोला

Sharad Pawar : “शरद पवार कधी कधी संभ्रमावस्था निर्माण करणारी विधाने करतात, अशी त्यांची कार्यपद्धती राहिली आहे”, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (दि. ९ मे) शिरूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना केला होता. आज शरद पवारांना या आरोपाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी यावर आपले परखड मत व्यक्त केले. “राजकारणामध्ये बालबुद्धी हे ज्यांचे वैशिष्ट आहे, असे अनेक लोक असतात. असे लोक बालबुद्धीने काही बोलत असतात. अशा लोकांकडे काय लक्ष द्यायचे?”, असे शरद पवार म्हणाले आहेत.

शिरूरमध्ये एका सभेत बोलत असतानाअजित पवार यांनी शिरूर विधानसेभेचे आमदार अशोक पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. अशोक पवार हे सध्या शरद पवार गटामध्ये आहेत. दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिपद दिल्यामुळे ते अजित पवार गटात गेले नाहीत. यावर नाराजी व्यक्त करताना अजित पवारांनी आपल्या गावराण शैलीत “आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो”, असा धमकीवजा इशारा दिला. यावरही पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली.

HSC Result 2024 : मोठी बातमी : बारावीचा निकाल 20 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता, दहावीचा निकाल कधी?

शरद पवार म्हणाले, “लोकांच्या मतदानाचा अधिकार सरकारचा प्रतिनिधी स्वतःकडे घेत असेल तर यावर आता काय बोलणार? मंत्री म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीवर काही पथ्य पाळण्याची जबाबदारी असते. त्यांची (अजित पवार) भाषा या चौकटीत बसणारी नाही. याबाबत आता जनतेनेच काय निर्णय घ्यायचा हे ठरवावे.”

नंदुरबार येथे जाहीर सभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांना एनडीएत येण्याची ऑफर दिली. यावरही शरद पवारांनी भाष्य केले आहे. मोदींना आता तुमची गरज भासत आहे? असा त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर पवार म्हणाले की, कुणाला काहीही गरज पडो, पण आम्ही ज्या विचारधारेत वाढलो, ज्या विचारधारेला घेऊन आम्ही पुढे जात आहोत. त्याच्या बाहेर आम्ही जाणार नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply