Sharad Pawar : PM मोदींची देश चालवण्याची पद्धत पाहून चिंता वाटते, शरद पवारांचे परखड मत

Sharad Pawar : 'आज मोदीसाहेब आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत. हे पाहिल्यानंतर चिंता वाटते.', असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. सासवड येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये शरद पवार यांनी हे वक्तव्य केले आहे. या सभेमध्ये भाषणादरम्यान शरद पवार यांनीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भाजपच्या नेत्यांवर टीका केली आहे.

सासवड येथील सभेदरम्यान बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, 'ही निवडणूक वेगळी आहे. ही निवडणूक देश कोणत्या पध्दतीने चालवायचा हे ठरवणारी निवडणूक आहे. आज मोदीसाहेब आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात ते पाहिल्यानंतर चिंता वाटते. लोकांच्या सहमतीने आणि लोकशाही मार्गाने सध्या देश चालवायची गरज आहे.', असे मत व्यक्त करत शरद पवार यांनी पीएम मोदींवर हल्लाबोल केला आहे.

Mumbai News : पालकांनो सावधान! मुंबईत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, डॉक्टरसह ७ जणांना अटक

शरद पवार यांनी पुढे सांगितले की, 'यांना देशाची घटना बदलायची आहे. त्यामुळेच ४०० पारचा नारा देत आहेत. पीएम मोदी ठिकठिकाणी जातात आणि भाषण करतात. एकदा त्यांनी दिल्लीत भाषण केलं. शेतीच्या क्षेत्रात ऐतिहासिक काम शरद पवारांनी केलं. तसंच, पवारांचा हात धरुन मी राजकारणात पावलं टाकली असं देखील ते म्हणाले होते. टीका करायचा त्यांचा अधिकार आहे.', असा टोला देखील त्यांनी मोदींना लगावला आहे.

तसंच, 'ज्यांनी irrigation बाबत आरोप केले. घोटाळ्याचे आरोप केले. ते आज सगळे कुठे आहेत? यावरून तुम्हाला मोदींच्या बोलण्याचा अर्थ कळला असेल. हुकुमशाहीला निमंत्रण देणाऱ्या प्रवृत्तीला बाजूला ढकलायचे असेल तर याचा पराभव केला पाहिजे. नुसती तुतारी नाही. तर तुतारी हातात घेऊन उभा असलेला माणूस ही आपली खूण आहे. सुप्रियाला निवडून द्या.', असे आवाहन त्यांनी सासवडकरांना केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply