Sharad Pawar : काही गोष्टींबाबत सरकारने समंजस भूमिका घ्यायची असते, असं का म्हणाले शरद पवार?

Sharad Pawar : कांदा निर्यात बंदी ही सरकारची भूमिका चुकीची आहे. मी कांदा उत्पादकांसोबत आहे. सध्याचे सरकार दर 15 दिवसाला आपली भूमिका बदलत आहे अशी खंत व्यक्त करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावर केंद्र सरकारवर टीका केली. काही गाेष्टींबाबत सरकराने समंजस भूमिका घ्यायची असते असा सल्ला देखील पवार यांनी सरकारला दिला. 

ज्येष्ठ नेते शरद पवार हे काेल्हापूर  जिल्हा दाै-यावर आलेत. माध्यमांशी बाेलताना शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या कारभाराविषयी टीका केली. ते म्हणाले मी शेती मंत्री असताना कधीच कांदा उत्पादकांवर कर बसवला नाही. त्यांचा माल जगात काेठेही विकण्यासाठी थांबवला गेला नाही.

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये दगडफेक, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत जमावाला पांगवलं; अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ

कवड्याच्या माळा घाला...

त्यावेळी माझ्यासमाेर भाजपचे लाेक कांद्याच्या माळा घालून आले. त्यावेळी मी त्यांना सांगितले कांद्याची किंवा कवड्याची माळ घालून या. कांद्याला कधी नाही ताे भाव मिळत आहे. तुम्ही दंगा करण्याचे कारण नाही. शेतक-याला दाेन पैसे मिळत आहेत. त्यामुळे त्याच्यावर कर लादणार नाही हे मी सभागृहात स्पष्ट केले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply