Shambhuraj Desai : ...तर जरांगे पाटलांना दिल्लीला सोबत घेऊन जाणार...; मराठा आरक्षणावर शंभुराज देसाईंचं मोठं वक्तव्य

Shambhuraj Desai : मराठा आरक्षाबाबत दाखल क्युरेटिव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने स्विकारले आहे. २४ जानेवारीला यावर पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे. यावेळी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात कोणते मुद्दे मांडावे यासाठी चर्चा सुरू आहे. अशात या मुद्द्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांना काही सुचवायचे असेल तर त्यांना देखील दिल्लीला घेऊन जाण्याची तयारी राज्य सरकारने दाखवली आहे. 

मंत्री  शंभुराज देसाई यांनी याबाबत माहिती दिली. क्युरेटिव्ह पिटीशनवेळी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात काय मुद्दे मांडावे यासाठी जरांगे पाटील आमच्यासोबत आले तर त्यांना दिल्लीला सोबत घेऊन जायची आमची तयारी आहे, असं विधान मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे.

Uddhav Thackeray Latest Speech : रामलल्ला तुमची संपत्ती आहे का? उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

मनोज जरांगे पाटील  यांना संयमाने घेण्याची विनंती करत उलट क्युरेटिव्ह पिटीशन सुनावणीवेळी राज्य सरकारने काय मुद्दे मांडावे याबाबत जरांगे पाटील यांनी मदत करावी. जरांगे पाटील यांना भेटून ते तयार असतील तर दिल्लीला कायदे सल्लागारांना भेटायला घेवून जावू तसं शक्य होत नसेल तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सरकारच्या कायदे सल्लागरांशी त्यांची चर्चा घडवून आणू असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.

४५ पेक्षा जास्त उमेदवार निवडून येणार

इंडिया आघाडीच्या बैठकीत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला तो त्यांचा त्यांना लखलाभ असो. महाविकास आघाडीमध्ये फॉर्मुला जरी ठरवला तरी किती जागा निवडून येणार आहेत याचा विचार करण्याची गरज आहे. मात्र लोकसभेच्या निवडणुकीला आजची तारीख लिहून ठेवा 45 च्यावर लोकसभेचे उमेदवार हे महायुतीचे निवडून येतील, असा विश्वास मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply