Shafali Verma : धोनीनंतर शेफालीच! कोणाला जमलं नाही ते करून दाखवलं

U19 T20 World Cup Ind vs Eng : अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाची पहिली आवृत्ती जिंकून टीम इंडियाला इतिहास रचला आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा सात विकेट्सनी पराभव करत ही स्पर्धा जिंकली आहे.या वर्षी पहिल्यांदाच अंडर-19 महिला टी 20 विश्वचषक खेळला गेला. त्यामुळे विजेत्या भारतीय संघाचे नाव इतिहासात नोंदवले गेले आहे. शेफालीने धोनीच्या 2007 च्या कारनाम्याची पुनरावृत्ती केली आहे.

16 वर्षांपूर्वी 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली, भारत प्रथमच टी 20 विश्वविजेता बनला आणि 1983 नंतर भारतीय संघाने प्रथमच विश्वचषक जिंकला. आज शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा महिला संघांने देखील पहिला अंडर -19 क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे.

2007 मध्ये पहिल्यांदा टी20 वर्ल्ड कप खेळवण्यात आला

2007 मध्ये पुरुषांचा टी20 विश्वचषक पहिल्यांदा खेळला गेला. टी20 फॉर्मेटमध्ये विश्वचषक आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्याचप्रमाणे महिला अंडर-19 टी-20 विश्वचषकही प्रथमच खेळवला जात आहे.याआधी पुरुष क्रिकेटमध्ये फक्त अंडर-19 विश्वचषक होता आणि तोही एकदिवसीय प्रकारात. महिला अंडर-19 विश्वचषक पहिल्यांदाच होत आहे. तोही टी-20 फॉरमॅटमध्ये. म्हणजेच धोनी आणि शेफालीमध्ये ही एक गोष्ट समान आहे.

तसेच 2007 मध्ये झालेला सामना दक्षिण अफ्रिका येथे खेळवण्यात आला होता. तेव्हा धोनीने टीम इंडियाला चॅम्पियन बनवले होते. आता महिली अंडर-19 टी20 सामन्याचे आयोजनदेखील दक्षिण अफ्रिकामध्ये करण्यात आले होते आणि भारतीय महिला संघ विजेता ठरला आहे.प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 69 धावांचे माफक लक्ष्य ठेवले होते. टीम इंडियाने ते सात विकेट्स गमावून पूर्ण केले.

भारतीय अंडर-19 महिला संघाने T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. भारताने 36 चेंडू शिल्लक असताना सहज लक्ष्य गाठले. सौम्या तिवारी 24 धावा करून नाबाद राहिली. तेथे जी. त्रिशानेही 24 धावांची खेळी खेळली. कर्णधार शेफाली वर्माने 15 धावांचे योगदान दिले.

भारतीय कर्णधार शफाली वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर संपूर्ण इंग्लिश संघाला केवळ 68 धावांत गुंडाळले. तितास संधू, अर्चना देवी आणि पार्श्वी चोप्रा यांनी 2-2 विकेट घेतल्या. मन्नत कश्यप, शेफाली वर्मा आणि सोनम यादव यांनी 1-1 विकेट घेतली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply