Mumbai Rain Alert : मुंबईसह ठाणे, रायगड पालघरमध्ये उद्या शाळांना सुट्टी, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Mumbai Rain Alert: मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाने जोरदार हजारी लावली आहे. पावसाने अनेक जिल्ह्यांमध्ये दाणादाण उडाली असून जनजीवन विस्कळीत झालंय. यातच मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे.

Monsoon Session: "वंदे मातरम् बोलू शकत नाही कारण..." अबू आझमींच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक, फडणवीसांनी दिला सल्ला

तर रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झालीय. या सर्व परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला आहे. यातच मुख्यमंत्र्यांनी उद्या (गुरुवारी) मुंबईसह ठाणे, रायगड पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

राज्यात मुसळधार पाऊस सुरु असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळपासूनच आपण मुख्य सचिव तसेच काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कुठलीही आपत्ती आल्यास तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत. तसेच मुंबई व परिसरातील मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकर सोडले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply