Satara Water Crisis : माण तालुक्यामध्ये पाणीटंचाई; तालुक्यातील ४२ गावांना टँकरने पाणीपुरवठा

Satara : पाणीटंचाईची भीषणता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यातील बहुतांश भागात हि टंचाई वाढत चालली असून सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात असणाऱ्या माण तालुक्यामध्ये देखील सध्या भीषण पाणीटंचाई सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच माण तालुक्यातील काही गावांमध्ये टँकर सुरू झाले आहेत. सद्यस्थितीला तालुक्यातील ४२ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

राज्यातील उन्हाची तीव्रता अधिक वाढत असताना पाणी टंचाईची भीषणता अधिकच वाढत आहे. पाण्याचे स्रोत आटू लागल्याने गावागावांमध्ये पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात देखील भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावांमध्ये असलेल्या विहिरींनी तळ गाठल्याने आता या भागामध्ये शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या पाण्याची खूप मोठी समस्या उभी राहिली आहे.

Dharashiv : जागरण-गोंधळात जेवणावर ताव मारला,७१ जणांना विषबाधा; अनेकांना ताप, खोकला, उलटी अन् जुलाब

४७ ट्रँकरने पाणी पुरवठा

सध्या या भागातील ४२ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्यातील ४२ गावे २९१ वाड्यावस्तीला ४७ टॅंकरने ६५ हजार १५२ नागरिकांची तहान भागविली जात आहे. तर ४० हजार २७० जनावरांना ९८ टँकरच्या खेपानी पाणी पुरवठा सुरू आहे. याशिवाय १७ विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. मात्र या भागात आता विहरी कोरड्या पडल्याचे पाहायला मिळत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातही तीव्र पाणीटंचाई

चंद्रपूर जिल्ह्यात पाणी टंचाई आता तीव्र होताना बघायला मिळत आहे. याचा पहिला फटका दालमिया सिमेंट प्रकल्पाला बसला आहे. हा सिमेंट प्रकल्प कोरपना तालुक्यातील वनोजा येथे असून या प्रकल्पाला जवळच्या पैनगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र आता नदीचे पात्र आटल्याने उत्पादनासाठी पाणी आणायचे कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याची गरज भागली नाही, तर प्रकल्प बंद करावा लागेल, अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख सुब्रायडू अय्यागरी यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply