Satara Rain : साताऱ्यासह कराड, पाटणला पावसाने झोडपले; कर्नाटक, बीड, सोलापूर, विदर्भातून आलेल्या ऊसतोड मजुरांचे मोठे नुकसान

Satara Rain :  साताऱ्यासह कराड, पाटण तालुक्यात आज बुधवारी पहाटे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामामधील सुरू असलेल्या पीक काढणीच्या कामात व्यत्य आला. दरम्यान, ऊस तोडीसाठी कर्नाटक, बीड, सोलापूर, विदर्भ, मराठवाड्यातून आलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपडीत पाणी जाऊन त्यांचे मोठे नुकसान झाले.

जीवनावश्यक वस्तूही भिजल्याने त्यांना सुरक्षित ठिकाणचा निवारा शोधावा लागला. कराड आणि पाटण तालुक्यात रविवारी पहाटे झालेल्या   आज पहाटेच्या सुमारास पुन्हा  पावसानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील भुईमूग, सोयाबीन, भात व अन्य पिकांची सुरू असलेल्या काढणीत व्यत्यय आला आहे. काही ठिकाणी शेतात पाणी साचून राहिल्याने काढणी ठप्प झाली आहे.

Maharashtra News : बळीराजाला दिवाळीपूर्वी खुशखबर! पहिल्या टप्प्यात 35 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपये अग्रीम पिकविमा वितरित

साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्यामुळे कर्नाटक, बीड, सोलापूर, विदर्भ, मराठवाड्यातून ऊसतोड मजूर साखर कारखान्याच्या परिसरात व कराड-पाटण तालुक्यातील मोठ्या गावात दाखल झाले आहेत. ते राहत असलेल्या परिसरात पावसाचे पाणी साचून त्यांचे जीवनावश्यक वस्तूंसह कपडे, अन्नधान्य भिजले आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचे वातावरण अजूनही कायम असल्याने ऊसतोडी एक-दोन दिवस बंद राहील, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *